Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गणपती विसर्जनाची प्रत्येक क्षणाची अपडेट एका क्लिकवर; पोलिसांनी लाँच केली विशेष वेबसाईट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 23 September 2026, 18:59

पुणे, ता. २३ : येत्या २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीकडे दरवर्षी मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदा विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारी गर्दी आणि वाहतूक लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

यंदा गणेश विसर्जनासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुमारे १० हजार अधिकारी आणि कर्मचारी मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर असतील. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवर मिळून ६३८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. नागरिकांसाठी शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यासोबतच गणेश विसर्जन मिरवणुकीशी संबंधित महत्त्वाची माहिती पुणेकरांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे पोलिसांकडून diversion.Punepolice.Gov.in ही विशेष ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर वाहतूक बदल, प्रमुख गणपतींच्या मिरवणुकीचे मार्ग तसेच इतर आवश्यक माहिती मिळणार आहे. मागील वर्षी दोन कोटी सात लाख लोकांनी या संकेतस्थळाचा वापर केल्याची माहिती देण्यात आली.

 

या ऑनलाइन सुविधेवर मानाच्या प्रमुख गणपतींसह शहरातील प्रसिद्ध गणपतींच्या विसर्जन मिरवणुका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या दिशेने पुढे जात आहेत, याची सद्यस्थितीतील माहिती मिळणार आहे. तसेच एखादी मिरवणूक सध्या नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती नागरिकांना मिळू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या वेळेनुसार इच्छित ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्याचे नियोजन करता येईल.

विसर्जन मिरवणुकीचे पुढील आणि शेवटचे टोक कोणत्या ठिकाणी आहे, याची माहितीही उपलब्ध होणार आहे. त्यावरून कोणते रस्ते केव्हा बंद किंवा सुरू होणार आहेत, याचा अंदाज घेऊन नागरिकांना आपल्या प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. बंद केलेले रस्ते, वाहतूक वळविण्यात आलेले पर्यायी मार्ग आणि परिस्थितीनुसार पुन्हा वाहतुकीसाठी खुले केलेले रस्ते याबाबतची अद्ययावत माहितीही संकेतस्थळावर मिळणार आहे.

याशिवाय नागरिकांना वाहन पार्क करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांसाठी आवश्यक माहितीही या ऑनलाइन सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुगल मॅपसोबत समन्वय साधून पुणे शहरातील कोणते रस्ते केव्हा खुले किंवा बंद राहणार आहेत, याची माहिती गुगलवरही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणाला नवं वळण! स्वाती-निलेशच्या चॅटिंगमधून 6 मार्चचं गूढ उलगडणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp