Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 18 October 2026, 20:38

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जुहू पोलीस ठाण्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याचे, तर त्याचा चालक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सात राऊंड गोळीबार केल्यानंतर दुचाकीवरून आलेले आरोपी पसार झाल्याची माहिती दिली जात आहे.

घटनेनंतर परिसरातील रस्ता बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी घटनास्थळी भेट दिली. यापूर्वी याच परिसरात चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे मुंबईतील चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या घटनेनंतर बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. सलमान खानसोबत काम करणाऱ्यांनाही अशाच परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा आशयाची धमकी या ऑडिओमध्ये असल्याचा दावा आहे.

पहा Video 👇

https://www.instagram.com/reel/Deo8i2sss9X/?utm_source=ig_web_copy_link&cplk=NTc4MTIwNjQ2YQ==

 

या घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांनी मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. आपल्या वडिलांच्या निधनाला दोन वर्षे झाली असून, अद्याप न्याय मिळालेला नसल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईतील सुरक्षेची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी स्वतःच्या सुरक्षेतही पुरेशी वाढ झालेली नसल्याचा दावा केला.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच पोलीस अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणेच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत असल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारी यांसारखी आव्हाने असताना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर होत असल्याचे त्या म्हणाल्या. आर्थिक अडचणी वाढल्यानंतर गुन्हेगारीच्या प्रश्नाकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने या विषयाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या कथित गोळीबाराच्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत नेमके काय सुरू आहे, असा सवाल त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे उपस्थित केला.

बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेला गोळीबार आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना मिळणाऱ्या धमक्यांचा उल्लेख करत त्यांनी मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरातील नागरिक आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या सुरक्षेबाबत सरकारने जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबईत यापूर्वीही चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींच्या निवासस्थानांबाहेर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल २०२४ मध्ये वांद्रे येथील सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. तसेच रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेरही गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त आहे.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. टायगर श्रॉफच्या गाडीवरील कथित गोळीबाराबाबत आरोपींची ओळख, हल्ल्यामागील कारण आणि व्हायरल ऑडिओची सत्यता याबाबत अधिकृत माहिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp