Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 31 August 2026, 16:38

शिरूर : शिरूर तालुक्यातील चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने परस्पर कुलूप ठोकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी(ता.३१)सकाळी उघडकीस आला.शाळेच्या प्रवेशद्वारालाच कुलूप असल्याने शाळेत दाखल झालेल्या तब्बल ९१ विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी भर उन्हात रस्त्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली.या संतापजनक प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील ९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.नेहमीप्रमाणे सोमवारी(ता.३१)सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाले.मात्र, शाळेच्या गेटला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशच करता आला नाही.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी नाईलाजाने रस्त्यावरच वर्ग भरविला.भर उन्हात रस्त्यावर बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र पाहून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली.

शाळेला कुलूप ठोकण्याचा अधिकार दिला कोणी?

 

शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सार्वजनिक जागा असताना परस्पर शाळेला कुलूप लावण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला कोणी दिला? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेचे नियमित कामकाज बंद पाडण्याचा हा प्रकार गंभीर असून, यामागे नेमके कोण आहे.याचा प्रशासनाने तातडीने छडा लावावा, अशी मागणी होत आहे.शांताराम पानमंद व दादाभाऊ पानमंद यांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?

शाळेला कुलूप लावण्यामागील नेमके कारण काय? हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला का? शाळेचे कामकाज विस्कळीत करण्याचा यामागे कोणाचा हेतू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने शोधणे गरजेचे आहे.

९१ विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी रस्त्यावर बसून शिक्षण घ्यावे लागणे ही केवळ एका शाळेची समस्या नसून शिक्षण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक हक्कांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही प्रशासनाने केवळ पाहत बसणे योग्य नाही.

या घटनेची तातडीने चौकशी करून अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा.संबंधितावर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी संतप्त पालकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या शाळेलाच कुलूप ठोकले जात असेल,तर जबाबदार कोण? हा सवाल आता चांडोह ग्रामस्थ आणि पालक प्रशासनाला विचारत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45
Next Post

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp