Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 16:52

नाशिक : महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या जामीन अर्जावर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली नाही. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि अ‍ॅड. अजय मिसर न्यायालयात उपस्थित होते. मात्र, अशोक खरातचे वकील अ‍ॅड. राहुल कासलीवाल वेळेवर न्यायालयात उपस्थित न राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता या जामीन अर्जावर १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि अ‍ॅड. अजय मिसर न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांचा पुकारा करण्यात आला. मात्र, राहुल कासलीवाल उपस्थित नसल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयाकडे अर्ध्या तासाची मुदत मागितली. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

सुनावणीनंतर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरातविरोधात महाराष्ट्र शासनाच्या एसआयटीने लैंगिक अत्याचाराचे आठ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी सहा गुन्हे सत्र न्यायालयात वर्ग झाले असून, दोन प्रकरणे अद्याप मॅजिस्ट्रेट न्यायालयात आहेत.

सत्र न्यायालयात वर्ग झालेल्या प्रकरणांपैकी एका प्रकरणात अशोक खरातने जामीन देण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकारने त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. विविध पीडित महिलांवर कथितरीत्या लैंगिक अत्याचार करताना त्यांच्या मनात भीती निर्माण केल्याबाबतचे पुरावे सरकारच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले.

 

१६ सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय या जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे. दरम्यान, अशोक खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी १२ महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरच्या सुनावणीकडे आता लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45
Next Post

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp