Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 17 May 2026, 17:39

Pune News : ओतूर : (पुणे) : वयोवृद्ध आजोबांच्या बंद घरात शिरून 7 तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक करण्यात ओतूर पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे, हा चोर दुसरा तिसरा कोणी नसून आजोबांच्या घराच्या शेजारी राहणाराच तरुण असल्याचे तपासात उघड झाले आहे. अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली. Pune News

अभिषेक खंडु कुटे (वय-32, सध्या रा. टिटवाळा, ठाणे, मूळ रा. नेतवड, जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या शेजारील तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून घरफोडीतील 7 तोळे सोन्याचे दागिने असा 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तान्हाजी बजाबा कुटे (वय- 56) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. Pune News

ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेतवड येथील बजाबा महादु कुटे (वय 95) यांनी आपल्या दिवंगत पत्नीचे सोन्याचे दागिने घराच्या पोटमाळ्यावरील एका पेटीत अत्यंत जिव्हाळ्याने जपून ठेवले होते. 1 ते 7 मे 2026 या कालावधीत अज्ञात चोराने या पेटीचा कडी-कोयंडा तोडून पेटीतील 3 तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र, अडीच तोळ्यांची 6 सोन्याची पाने व १ पुतळा, अर्धा तोळ्याची नथ आणि 1 तोळा वजनाच्या सोन्याच्या पेट्या असा एकूण 4 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी बजाबा यांचा मुलगा तान्हाजी कुटे यांनी फिर्याद दिली होती. Pune News

गुन्हा दाखल होताच पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी तपासाची चक्रे वेगवान केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी राहणारा याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. पोलिसांनी बुधवारी (ता. 13) त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. Pune News

 

ओतूर पोलिसांनी आरोपी अभिषेक कुटे याच्याकडून चोरीला गेलेले 7 तोळे वजनाचे सर्वच्या सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आपल्या पत्नीच्या आठवणींचे दागिने सुखरूप परत मिळाल्याने 95 वर्षांच्या बजाबा आजोबांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. ओतूर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे जुन्नर तालुक्यातून कौतुक होत आहे. Pune News

सदरची यशस्वी कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल गोडसे, आशिष जगताप आणि योगेश उकिर्डे यांच्या पथकाने केली आहे. Pune News

कोट : 

“नागरिकांनी आपल्या घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तसेच, गावातील सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी गावातील मुख्य चौक आणि संवेदनशील ठिकाणी जास्तीत जास्त सीसीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवावेत.” Pune News
ज्ञानेश्वर बाजगीरे (सहायक पोलीस निरीक्षक, ओतूर पोलीस स्टेशन)

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31
Next Post

Daily Player at DudeSpin Casino Reveals Honest Thoughts from Australia

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp