हडपसर : हडपसर परिसरातील गोरगरीब, कष्टकरी कामगार, विधवा महिला, अपंग आणि दिव्यांग नागरिकांसाठी मोफत रेशन कार्ड शिबिराचे आयोजन रविवारी (ता.७) करण्यात आले होते.
स्मितसेवा फाऊंडेशनने हडपसर परिसरामध्ये गोरगरीब लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करून तसेच प्रचार व प्रसार करून नागरिकांचा सर्वे करण्यात आला. या सर्वे मध्ये अनेक लोकांना रेशन कार्ड नाहीत असे संस्थेचे निदर्शनात आले. या अनुषंगाने स्मितसेवा फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे एफडीओ यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. तसेच हडपसर परिमंडल अधिकारी विभाग ड अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याशी पाठपुरावा करून नागरिकांना नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी रविवारी या शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरामध्ये एकूण ३५० लोकांनी भाग घेतला होता. या शिबिरामध्ये रेशनकार्ड दुरुस्ती, नाव टाकणे, नाव कमी करणे, पत्ता बदलणे, बंद पडलेले रेशनकार्ड चालु कसे करावे याचे नागरीकांना मागदर्शन करून लोकांची रेशन कार्ड संबंधी कामे घेण्यात आली. त्यातील १९६ नागरिकांच्या रेशनकार्ड विषयाची कामे त्याच वेळी मार्गी लावण्यात यश आले. उरलेल्या नागरीकांची कामे कागद पत्रे अपुर्ण असल्याने झाली नाहीत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ती कामे पूर्ण होतील.
दरम्यान, या शिबिराचे आयोजन स्मितसेवा फाऊंडेशन व अन्नधान्य वितरण कार्यालय हडपसर यांच्या संयुक्त करण्यात आले होते. या शिबिरासाठी स्मितसेवा फाउंडेशन अध्यक्षा व भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष पुणे शहर स्मिताताई तुषार गायकवाड, हडपसर अन्नधान्य वितरण कार्यालय परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ तसेच सुनीता रोडे, चैताली गायकवाड, अलका चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर भाजपा युवा मोर्चा हडपसर सरचिटणीस सागर बारदेसकर, भटक्या व विमुक्त जाती जमाती आधार संघ अध्यक्ष हरी सावंत, संघटक राकेश भोसले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना स्मितसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्ष स्मिता गायकवाड म्हणाल्या कि, हडपसर परिसरातील झोपडपट्टी मधील तसेच हडपसर परिसरातील गृहनिर्माण सोसायटी मधील वाड्या वस्ती मधील अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. या समस्या सोडवण्याबाबत स्मितसेवा फाउंडेशन नियोजन पद्धतीने एक सेवक म्हणून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविणार आहेत. तसेच शनकार्ड विषयची अपुर्ण कागद पत्रे असलेल्या नागरिकांची कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुढील १५ दिवसात कामे मार्गी लावणार आहे. असे गायकवाड यांनी सांगितले आहे.
यावेळी हिंदवी स्वराज्य युवा संघटना चे अध्यक्ष अभिजीत बोराटे, संभाजी ब्रिगेड उपजिल्हाध्यक्ष अनिल बोटे पाटील, तुषार गायकवाड, गणेश काळे, आण्णा बांदल, सचिन इचके, डॉ. अशोक सोरगावी, नितीन खुडे, व्यंकटेश भंडारी, अनिल टेकळे, सलमान शेख, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षा सविता हिंगणे, भाजपा सरचिटणीस शोभा लगड, छाया गदादे, मीना पिंटो, सुनीता रायकर, छाया दांगट, रेणुका गड्डा, दिपाली माटे, कविता पाटील, ज्योती तोडकर, अनिता खुडे, वैशाली पाटील, छाया भिसे, भगीरथी पाटील, मनीषा यादव, अमृता यादव, त्रिशाला वर्मा, विजया भूमकर, नयना सुकळे, अनघा टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते, स्मितसेवा फाउंडेशनचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.