Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील पाईपलाईनमध्ये अडकलेल्या रानगव्याची 6 तासानंतर सुटका..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 30 June 2026, 19:07

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पाणीपुरवठा वाहिनीच्या दोन मोठ्या पाईप्सच्या मध्यभागी बिकट अवस्थेत अडकलेल्या रानगव्याला 6 तासांच्या अथक परिश्रमांनंतर या सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. वन विभाग, पोलीस, अग्निशमन दल आणि ‘रेस्क्यू’ टीमच्या अथक परिश्रमांनंतर या रानगव्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील विश्रांती नगर कॅनल रोड येथे मंगळवारी (ता. 30) सकाळी अकरा वाजता स्थानिक नागरिकांना रानगवा पाईपलाईनमध्ये अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने याची माहिती वन विभागाला दिली. रानगवा ज्या ठिकाणी अडकला होता, ती जागा अत्यंत किचकट आणि आव्हानात्मक होती. जराशी चूकही रानगव्याच्या जिवावर बेतू शकत होती. त्यामुळे संपूर्ण प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलली.

माहिती मिळताच पुणे वन विभाग, पुणे शहर पोलीस, अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका (PMC), आणि ‘RESQ’ चॅरिटेबल ट्रस्टचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रानगव्याला प्रथम सुरक्षितपणे भूल देण्यात आली. रानगवा सुस्त झाल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अत्यंत कौशल्याने त्याला दोन पाईप्सच्या मधून बाहेर काढण्यात आले आणि त्याची यशस्वी सुटका झाली.

 

सुटकेनंतर रानगव्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या त्याला पुढील उपचार आणि डॉक्टरांच्या देखरेखीसाठी वन विभागाच्या बावधन येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) येथे हलविण्यात आले आहे. रानगव्याची प्रकृती सध्या स्थिर असून, सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुरक्षितपणे सोडण्यात येईल.

दरम्यान, या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व पुणे वन वृत्ताचे वन संरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून केले. तसेच भांबुर्डा वनपरिक्षेत्राचे अधिकारी मनोज बारबोले, वन कर्मचारी, आणि RESQ ट्रस्टच्या प्रतिनिधींनी यासाठी मोलाचे सहकार्य केले.

याबाबत बोलताना उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस म्हणाले, “सर्व यंत्रणांचा समन्वय आणि तात्काळ प्रतिसाद यामुळेच ही आव्हानात्मक मोहीम फत्ते झाली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रानगव्याला कोणतीही मोठी दुखापत न होता सुरक्षित सुटका करण्यात आम्हाला यश आले आहे. उपचार पूर्ण झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येईल.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरूरमध्ये जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.