Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे मेट्रोच्या ताफ्यात आणखी १२ नवीन मेट्रो ट्रेन; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार होणार गाड्यांचा संच

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 8 July 2025, 17:31

पुणे: पुणे मेट्रोच्या पीसीएमसी-निगडी आणि स्वारगेट-कात्रज या मार्गिकांच्या प्रस्तावित विस्तारीकरणाला मान्यता मिळाली आहे. यासाठी लवकरच १२ नवीन मेट्रो ट्रेन खरेदी करण्यात येणार आहेत. प्रत्येक ट्रेनसाठी ३ डब्यांचा समावेश असेल. यामुळे पुणे मेट्रोच्या एकूण ताफ्यातील गाड्यांची संख्या ४६ वर जाणार आहे.

महामेट्रोने या खरेदीसाठी ‘टीटागढ रेल सिस्टिम लिमिटेड’ आणि ‘टीटागढ फिरेमा’ या कंपन्यांना एकत्रितपणे ऑर्डर दिली असून, एकूण ४३०.५३ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या ट्रेन पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत तयार केल्या जाणार असून, यापूर्वीच्या ट्रेनप्रमाणे अल्युमिनियम बॉडी वापरून बनवण्यात येणार आहेत.

विस्तारित मार्गासाठी सज्ज मेट्रो

पीसीएमसी ते निगडी या मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू असून, स्वारगेट ते कात्रज या मार्गासाठी लवकरच ठेकेदारांची नेमणूक होणार आहे. हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यानंतर त्वरित मेट्रो सेवा सुरू करता यावी यासाठी ही नव्या ट्रेन खरेदीची प्रक्रिया राबवली जात आहे.

पुढील ३० महिन्यांत गाड्यांची टप्प्याटप्प्याने भर

या १२ मेट्रो ट्रेन पुढील ३० महिन्यांत टप्प्याटप्प्याने पुणे मेट्रोच्या ताफ्यात दाखल होतील. या सर्व गाड्या सध्याच्या मेट्रो ट्रेनप्रमाणेच पूर्णतः वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे, उद्घोषणा यंत्रणा, डिजिटल डिस्प्ले आदी सुविधांनी युक्त असतील

 

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले, “पीसीएमसी ते निगडी या मार्गासाठी आवश्यक असलेल्या १२ नवीन मेट्रो ट्रेनसाठी महामेट्रोने ऑर्डर दिली आहे. यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यावर तत्काळ मेट्रो सेवा सुरू करता येणार असून, प्रवाशांना त्याचा थेट लाभ मिळेल.”

ही विकास योजना पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना मेट्रोसेवेचा अधिक व्यापक आणि सुलभ अनुभव मिळणार असून, वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

एक व्हिडिओ, राग अनावर अन् हल्ला! नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31
Next Post

पावसात पर्यटनाचा प्लॅन बनवताय? थांबा!... पुणे पर्यटनावर जिल्हाधिकाऱयांचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp