पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे यादरम्यान पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांचे निकाल 4 जून रोजी जाहीर केले जाणार आहे.
तसेच यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाची माहिती दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. तर पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात13 मे रोजी मतदान घेतले जाणार असून तिसऱ्या टप्यात बारामती तर, चौथ्या टप्यात पुणे आणि शिरूर मतदार संघाचा समावेश आहे.
पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीकडून भाजपाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीने अद्याप त्यांच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तसेच बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली नाही.
कोणत्या मतदारसंघात मतदान कधी होणार?
तिसरा टप्पा : 7 मे 2024 – बारामती
चौथा टप्पा : 13 मे 2024 – पुणे, शिरुर
मतमोजणी कधी होणार?
4 जूनला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
पहिला टप्पा
19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा
26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा
7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा
13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा
20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ