उरुळीकांचन : शिरुरच्या वैभवाचे दिवंगत नेते बाबुराव पाचर्णे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. त्यांनी माझ्यात पाहिलेले आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा माझ्या जनतेच्या सेवेसाठी व्यथित केला आहे. आपण राजकीय भुमिकेतून आयुष्यात प्रत्येक क्षण जनतेच्या सेवेसाठी खर्ची केल्याचे समाधान आहे. अशा सर्व भुमिकूत कौंटुबिक जीवनात वेळ मिळाला नाही. येणारी पुढील भुमिका ही जनतेच्या हितासाठी राहणार असून शिरुर-हवेली तालुक्यात विकासाचे व्हिजन घेऊन काम करणार असल्याचे भाजप नेते प्रदिप कंद बोलताना म्हणाले.
शिरुर-हवेली मतदारसंघात भाजप व प्रदिप कंद समर्थकांचा विराट निर्धार मेळावा पेरणेफाटे येथे संपन्न झाला. या मेळाव्यात भाजप नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदिप कंद यांनी विधानसभा लढविण्याची भूमिका स्पष्ट केली.
पुढे बोलताना कंद म्हणाले, मला राजकीय आयुष्यात क्रिकेट खेळाडू ते विद्यार्थी दशेतच ग्रामपंचायत सदस्य ते सरपंचपद अशी जबाबदारी मिळाली. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारुन युवकांना राष्ट्रवादीत काम करण्याची संधी मिळून दिली. 2002 ला मातोश्रींना जिल्हा परिषदेत पाठविण्याची संधी असू की 2004 मध्ये विलास लांडे यांना आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारीही त्यावेळी पूर्ण केली आहे. 2007 ला जिल्हा परिषद गट विजय करण्याची ताकद सर्वांनी माझ्या माध्यमातून दाखवून दिली. 2012 ला राज्यात जिल्हा परिषदेवर साडे चौदा हजार मताधिक्याने विजय मिळवला. याबरोबरच शिरुरमध्ये 350 कामे केली तसेच जिल्ह्यात 3500 कोटींचे विकासकामे केली आहे. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करुन आक्षेप घेण्यात आले. परंतु निष्ठा ठेवत 2019 पर्यंत अपमान झेलत पक्षात काम करत राहिलो.
याबरोबरच अजित पवार आणि दिलीप वळसेपाटील यांनी 2019 ला उमेदवारीचा शब्द दिला. परंतु उमेदवारी मिळाली नाही आता 2024 ला ते स्वतः हा उभे राहणार म्हणल्यावर मी थांबलो आहे. परंतु त्यांनी मतदारसंघ भाजपला सोडविण्याचे धैर्य न दाखविल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. दोनवेळा थांबूनही मला संधी मिळत नसल्याने शेवटी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे प्रदिप कंद यांनी स्पष्ट केले.
यावेळी यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रामभाऊ दाभाडे, शंकरकाका भूमकर, पुणे जिल्हा भाजप समन्वयक धमेंद्र खांडरे, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, शशिकांत गायकवाड, सुदर्शन चौधरी, शिरुर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, राजाभाऊ मांडरे, भाजप शिरुर तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, पै. संदिप भोंडवे, संदिप सातव, अजिंक्य कांचन, कमलेश काळभोर, विकास जगताप आदीं पदाधिकारी उपस्थित होते.