दीपक खिलारे
इंदापूर Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी विविध विषयावर सुसंवाद, विविध सामाजिक प्रश्नाबाबत लोकांच्या मनातील भावना लक्षात घेऊन मन की बातच्या माध्यमातून सुसंवाद साधत आहेत. (Politics) देशातील लाखो-कोटी लोकांना हा कार्यक्रम आपला वाटणारा ठरला असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी काढले. (Politics)
इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे स्क्रीनवर आयोजन
इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात रविवारी (दि.30) भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर 100 वा ‘मन की बात ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित शहरातील नागरिक, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त गौरवोद्गार काढले.
ते पुढे म्हणाले की, ऑक्टोबर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरू केला आज 100 वा भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून विविध विषयावर जनतेशी सुसंवाद साधला. याकार्यकमाच्या माध्यमातून लाखो कोटी लोक जोडले गेल्याने देशातील प्रत्येकाला हा कार्यक्रम आपला वाटत आहे.
भारतीय जनता पार्टीचे इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर आभार माजी नगरसेवक गोरख शिंदे यांनी मानले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, नगरसेवक कैलास कदम, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे, रघुनाथ राऊत, नाना पाटील, अशोक खेडकर ,सागर गानबोटे, ललेंद्र शिंदे, संतोष देवकर, मच्छिंद्र शेटे, अविनाश कोथमीरे उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :