पुणे Police Recruitment : आंबेगाव तालुक्यातील बागायतदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंगवे गावची ओळख आता ’पोलिसांचे गाव’ अशी झाली आहे. (Police Recruitment) सध्या गावातील १० जण पोलिस दलात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. (Police Recruitment) २३ जण पोलिस सेवेतून निवृत्त झाले आहेत. (Police Recruitment) शिंगवेतील शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण पोलिस दलात भरती झाले. यामध्ये गावातील मुलीही मागे राहिल्या नाहीत. (Police Recruitment)
बागायतदारांचे गाव बनले पोलिसांचे गाव, शिंगवे गावातील ४ मुलींची पोलीस खात्यात निवड
नुकतीच गावातील चार मुलींची नव्याने पोलिस खात्यात नियुक्ती झाली आहे. ऐश्वर्या अंकुश साळी (पुणे शहर), प्रांजल भीमाजी गोरडे (मीरा भाईंदर), प्रीती रमेश गाढवे (नवी मुंबई), मयूरी प्रशांत गोरडे (मुंबई पोलिस) येथे निवड झाली आहे. या चारही मुलींचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. त्यातील प्रांजल गोरडे हिचे चुलते भारतीय सैन्य दल, रेल्वे पोलिस खात्यात आहेत. त्यांचा आदर्श घेऊन ती पोलिस दलात भरती झाली आहे.
शिंगवे गावातील तरुणांनी हवालदार ते पोलिस दलातील अधिकारीपदावर काम केले आहे. निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत वाव्हळ यांना उत्तम कामगिरीमुळे राष्ट्रपती शौर्यपदक मिळाले. ते आता गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून गेल्या दहा वर्षांपासून काम पाहत आहेत. सध्या शिंगवे गावातील दहा जण पोलिस दलात कार्यरत आहेत..
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Police Recruitment | बारामती तालुक्यातील करंजे- देऊळवाडी येथील पारधी समाजातील महिला झाली पोलीस