-प्रदिप रासकर
निमगाव भोगी : कवठे येमाई (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील रोहीलवाडी – पवारवस्ती येथील गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून ते नष्ट केले. या प्रकरणी अक्षय बाळु देवकर आणि सागर गणपत गंडगुळ (दोघेही रा. कवठे येमाई) यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय देवकर आणि सागर गंडगुळ हे मानवी आरोग्यास अपायकारक असणारे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तापवायचे. तसेच ते कच्चे रसायन गाळुन त्यापासुन तयार झालेली गावठी हातभट्टीची दारू तसेच ताडी लोकांना पिण्याकरिता त्याची विक्री करत होते. यासंदर्भात खबऱ्यामार्फत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस हवालदार भवर, प्रवीण सांगळे, पोहवा सुद्रिक, रावडे, सचिन भोई यांनी छापा कारवाई करून एकुण 1,54,875/- रू. किंमतीची गावठी हातभट्टी दारू, कच्चे रसायन, ताडी व गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक साहित्य जप्त करून ते जागीच नष्ट केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत.
आपल्या जवळपास कोणी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी तयार करीत असल्यास त्याबाबत मो.नं. 7738601191 यावर माहिती दयावी. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे.