Pimpri News : पिंपरी, (पुणे) : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या प्रियकराच्या मानेवर आणि चेहेऱ्यावर धारधार शास्त्राने सपासप वार करून त्याचा मृतदेह मुळशी धरणात फेकून दिल्याची घटना घडली आहे. हि घटना २४ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी संबंधित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
किशोर प्रल्हाद पवार (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना घडली होती. या घटनेत पोलिसांनी अक्षय भास्कर खिल्लारे (वय-२१) याला अटक केली आहे. (Pimpri News) सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांची कामगिरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि किशोर हे दोघे मित्र आहेत. आरोपी अक्षय याने किशोरला माझ्यासोबत चल असे म्हणून त्याला सोबत घेतलं आणि सुस गावातून गाडीवर घेऊन वारक या गावाजवळ आला. गावाजवळ असणाऱ्या मुळशी धरणाच्या पाण्याजवळ घेऊन आला. (Pimpri News) लघुशंका करण्याच्या निमित्ताने त्याने किशोर याच्या पाठीमागून त्याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर विळ्याने वार केले.
या हल्ल्यात किशोरचा जागेवरच मृत्यू झाला. मात्र, मृतदेह कुणाला सापडू नये म्हणून त्याचे हात पाय कपड्याने बांधून त्याचा मृतदेह मुळशी धरणात फेकून दिला होता. (Pimpri News) किशोर बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलिसात दिली होती.
दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपास करत असताना पोलिसांना किशोर हा अक्षय सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Pimpri News) त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.