Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : “मराठी संस्कृती संवर्धनासाठी पुस्तके आणि मानसिक बळ देऊन पाठीशी उभे राहावे” – रूपाजी गणू यांचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 October 2023, 12:57

प्रदीप गांधलीकर
Pimpri News  : पिंपरी  : “सुमारे चार पिढ्यांपासून मॉरिशस येथे स्थलांतरित झालेला मराठी समाज, सणसमारंभांच्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती जोपासण्याचा आणि वृद्धिंगत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. आपल्याकडील पुस्तके आणि मानसिक बळ देऊन आमच्या पाठीशी उभे राहावे!” असे आवाहन रूपाजी गणू यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवारी (ता.१) केले.

रूपाजी गणू यांना संस्कृती संवर्धन पुरस्कार प्रदान

कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी या संस्थेच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते रूपाजी गणू यांना मॉरिशस मधील मराठी भाषा व संस्कृती संवर्धनाच्या कार्यासाठी तेथील मराठी मंडळीचे प्रतिनिधी म्हणून संस्कृती संवर्धन पुरस्कार प्रदान करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कासारवाडी येथील श्री दत्तमंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त शिवानंद स्वामी महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच उद्योजक विजय जगताप आणि कलारंजनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. (Pimpri News ) याशिवाय कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, माजी नगरसेवक सुरेश भोईर, जयंत उर्फ अप्पा बागल, ह. भ. प. रामदास साखरे, भारत केसरी विजय गावडे,ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, अशोक गोरे, पंकज पाटील, तानाजी एकोंडे, नीलेश शेंबेकर, पूनम गुजर, आत्माराम हारे, फुलवती जगताप, मुरलीधर दळवी, तसेच गणेश गावडे आदी मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

 

रूपाजी गणू यांनी उपस्थितांशी मुक्तसंवाद साधून मॉरिशसच्या भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थित्यंतरांमध्ये मूळच्या मराठी माणसांनी कला-संस्कृती संवर्धनासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देताना, “१८५० सालापासून मजूर म्हणून त्या बेटावर आलेल्या महाराष्ट्रातील माणसांनी आपली संस्कृती विसरली नाही. याउलट साहित्य, नाट्य, संगीत या कलाविष्कारांच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची पताका तिथे डौलाने फडकत आहे. भारतातून अन् विशेषतः महाराष्ट्रातून कोणीही पर्यटक आल्यावर त्याचे आपुलकीने स्वागत केले जाते. (Pimpri News ) आर्थिकदृष्ट्या आम्ही सुस्थितीत असलो तरी आमची कला, साहित्य, संस्कृतीची भूक शमविण्यासाठी सांस्कृतिक गोष्टींचे आदानप्रदान करून महाराष्ट्र – मॉरिशस हे ऋणानुबंध अजून दृढ करूया!” अशी भावनिक साद घातली.

गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतातून, “रूपाजी गणू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात अथक प्रयत्नातून मॉरिशस येथे भारताबाहेरील भारत उभा केला आहे!” असे गौरवोद्गार काढले. शिवानंद स्वामी महाराज यांनी अध्यक्षीय मनोगतातून छत्रपती शिवाजीमहाराज, मराठी संस्कृती, धार्मिक परंपरा याबाबत मॉरिशसच्या भूमीत कार्यरत असलेली चळवळ पाहता तेथे साहित्य संमेलन घेण्यात यावे, असे मत मांडले.

दरम्यान, यावेळीआंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिकदिनाचे औचित्य साधून नंदकुमार मुरडे, शोभा जोशी आणि अश्विनी रानडे या साहित्यिकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. (Pimpri News ) पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकात मॉरिशस भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. तिथल्या मराठी संस्कृतीविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले. तर आभार सुरेश कंक यांनी मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : चिंचवडमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान

Pimpri News : विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोशीमध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

Pimpri News : ‘डीजे वाजवू नका’, म्हटल्याच्या रागाने कुटुंबाला कोयता, लोखंडी सळई, लाथांनी मारहाण

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Rohit Pawar : विकास लवांडे शाईफेक प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांत अटक न झाल्यास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखणार – आमदार रोहित पवार

Saturday, 9 May 2026, 19:12

Hadapsar News : जेवण करून बाहेर पडलेल्या मित्रांवर धारदार शस्त्राने वार; दोघे गंभीर जखमी

Saturday, 9 May 2026, 19:01

Vikas lawande News : धर्मकार्यात कोणत्या लवांडेनी लडबूड करु नये : आमदार महेश लांडगे

Saturday, 9 May 2026, 18:24

Pune News : कडक उन्हात कांदा काढणी करताना महिलेचा मृत्यू ; आंबेगाव तालुक्यातील घटना..

Saturday, 9 May 2026, 18:17

Pune News : “मी इथला भाई आहे…” म्हणत दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला , चौघांवर गुन्हा दाखल

Saturday, 9 May 2026, 18:05

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

Saturday, 9 May 2026, 17:32
Next Post

Shirur News : पारनेर ते टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती एसटी बस सेवा सुरू करा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.