Pimpri News : पिंपरी : गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू झाली आहे. बाप्पांच्या सजावटीसाठी मंडप उभारणीला वेग आला आहे. गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी दुकाने सजली आहेत. मात्र, गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी दुकाने उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास, कडक कारवाईचा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिला आहे.
विनापरवाना मूर्ती विक्री केल्यास कडक कारवाई
अनेकदा शहरात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने विनापरवाना उभारली जातात. मूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. (Pimpri News ) मात्र, महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक असूनही घेतला जात नाही. यामुळे अशा विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे.
परवाना अर्जासोबत ४९९ रुपये शुल्क भरावे लागते. अर्जासोबत जागेचा नकाशा, शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पॅनकार्डची प्रत जोडावी लागते. परवाना मिळाल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत मूर्तीची विक्री करता येणार आहे. (Pimpri News ) व्यवसाय परवाना असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून स्टॉलसाठी मंडप टाकण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचाही ना-हरकत दाखला जोडणे आवश्यक असते.
आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. (Pimpri News ) त्यावर तत्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरीत आगीत होरपळून मृत्यू झालेल्या त्या चौघांची काश्मीर ट्रिप ठरली अखेरची…!
Pimpri News : अजित पवारांच्या पिंपरी महापालिकेतील बैठकीला शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती