Pimpri News : पिंपरी : मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन मोबाइल क्रमांक घेवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. नंतर तिचा बळजबरीने गर्भपात केला. तसेच लग्नास नकार देत शारिरीक संबंध करतानाचा ‘व्हिडीओ व्हायरल’ करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार ताथवडे (पिंपरीचिंचवड) परिसरात उघडकीस आला आहे.
वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri News) त्यानुसार पोलिसांनी आकाश शंकर जगदाळे (वय ३२, रा. जिजामाता चौक, कडोळकर कॉलनी, तळेदाव दाभाडे) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर लग्नासाठी प्रोफाइल तयार केली होरी. त्याच्यावरुन आरोपीने मोबाइल क्रमांक घेतला. तरुणीशी ओळख वाढविली. (Pimpri News) तिला लग्नाचे आमिष दाखविले. लॉजवर व मोटारीत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, यामधून तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर आरोपीने ‘तू गर्भपात केला तरच मी तुझ्याशी लग्न करेन, अन्यथा मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ अशी धमकी दिली. पीडितेला तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर लग्नास नकार देत आरोपीने शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपीने मोबाइलमधील शारीरीक संबंध करतानाचा व्हिडीओ पीडितेला दाखविला. ‘मी आपले शारिरीक संबंध करतानाचे व्हिडीओ माझ्या मोबाइलमध्ये काढले आहेत,(Pimpri News) तू जर मला त्रास दिला तर मी तुझे व्हिडीओ व्हायरल करेन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप