Pimpri News : पिंपरी-चिंचवड : ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना एकापाठोपाठ एक अशा तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ८) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटात ३ स्कूल बस जळाल्या. गॅस रिफिलिंग करताना झालेल्या या स्फोटांवरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तंबी देण्यात आल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांचे धाबे दणाणले
गॅस टँकरचा स्फोट झाला, त्या परिसरात शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Pimpri News) या पार्भूमीवर बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, पुण्यातील ससूनमधून ड्रग्स माफिया चालते, त्याच पद्धतीने पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे भागात गॅस माफिया चालतो का? असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला. आज सकाळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्फोट झालेल्या ठिकाणी भेट दिली.
या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी होते, त्यांना तानाजी सावंत यांनी चांगलेच फैलावर घेतले. ज्या परिसरात ही घटना घडली तिथे कॉलेज, स्कूल आहे. दिवसा घटना घडली असती तर शेकडो जण जखमी झाले असते किंवा आणखी काही घडले असते. गॅस रिफिलिंग हे दोन नंबरचे आहे. (Pimpri News) ससूनमध्ये ड्रग्स माफिया सुरू आहे, तसे येथे गॅस माफिया सुरू आहे का? तत्काळ २४ तासांच्या आत या ठिकाणचे तीन ते चार अधिकारी बदलले गेले पाहिजेत, अशी तंबी सावंत यांनी दिली. या सगळ्या प्रश्नांवर उपस्थित पोलीस अधिकारी हे केवळ होकारार्थी उत्तर देत होते. या प्रकरणी तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरीचे माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
Pimpri News : “राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण अत्यावश्यक!” : पद्मश्री रमेश पतंगे