तळेगाव दाभाडे: आगामी तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याने नगरपालिकेच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ‘महायुती’तील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. (Pune Politics)

युतीतर्फे निवडणूक लढवली जात असतानाही, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि उमेदवारी वाटपातील मतभेदामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली धुसफूस या गोंधळाच्या निमित्ताने स्पष्टपणे दिसून आली. अंकिता खाणे यांच्या एक्स या माध्यमावर या बाबतचा व्हिडीओ दिसून येत आहे.

हेही वाचा: भावाकडून अवैध संबंधासाठी दबाव, तीचा नकार, शेतात नेलं अन् नग्न अवस्थेत..

पहा Video…
तळेगावमध्ये भाजप-अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; अर्ज मागे घेतानाचा व्हिडीओ समोर#BJP #NCP #Punenews pic.twitter.com/XZSfQ8eAFC
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 22, 2025
अर्ज माघारीच्या दिवशी गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत युती आहे. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपालिकेच्या इमारतीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा गदारोळ झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच तळेगाव पोलिसांनी मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
19 नगरसेवक बिनविरोध
या निवडणुकीत आतापर्यंत 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आणि भाजपचे 9 उमेदवार समाविष्ट आहेत. निवडणुकीचा हा टप्पा शांततेत पार पडला असला तरी, उर्वरित जागांवर असलेल्या मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा: पुणे हादरलं! कात्रजच्या डोंगराळ भागात आढळला मृतदेह; CCTV मधून धक्कादायक खुलासा…
युतीचे नेते एकत्र आले असले तरी प्रभाग रचना, उमेदवारी वाटप आणि स्थानिक स्तरावरील गटबाजीमुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तथापि, निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महायुतीचा हा संघर्ष कशाप्रकारे वळण घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: रात्री वहिणीने दिराला रूममध्ये बोलावलं, रूम बंद केली अन्… घडलं भयंकर







