Pune News : पुणे : रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 11010 पुणे-सीएसएमटी मुंबई सिंहगड एक्स्प्रेस मध्ये पिंपरी आणि चिंचवड स्थानकासाठी दोन स्वतंत्र अनारक्षित डबे( earmarking) सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ही व्यवस्था आज रविवार दिनांक 11 जूनपासून लागू होईल. (Additional two second class chair car coaches in Pune-Mumbai Sinhagad Express)
पिंपरी, चिंचवडसाठी स्वतंत्र डबे
यापूर्वी पिंपरी आणि चिंचवडसाठी एकच डबा (अर्धा-अर्धा) होता. प्रवाशांच्या मागणीनुसार आता रेल्वे प्रशासनाने पिंपरीसाठी डी-7(इंजिनपासून आठवा डबा) आणि चिंचवड स्थानकासाठी डी-8 (इंजिनपासून नववा डबा) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पिंपरी आणि चिंचवडच्या प्रवाशांना विशिष्ट (separate) कोच उपलब्ध झाल्याने गर्दी टाळण्यास मदत होईल.
ट्रेनच्या सध्याच्या संरचनेत 16 डबे आहेत.(Pune News) खडकी, शिवाजीनगर आणि लोणावळा येथील उर्वरित डब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महाराष्ट्र बनले सायबर भामट्यांचे हब ; तब्बल ९०० कोटींची लूट
Pune News : पुण्यातील दिव्यांक जगतापची इंडिया बुकमध्ये नोंद
Pune News : पुण्यातील बेपत्ता तरुणीचे गूढ उकलले ; पोलिसही चक्रावले…