पुणे : PMRDA NEWS – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अंतर्गत ड्रोन प्रणाली मागील वर्षी माहे ऑगस्ट २०२२ पासून वापरण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया, अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्याकरिता ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. (PMRDA NEWS) पीएमआरडीए हद्दीत सुमारे ८१४ गावांचा समावेश असून एवढ्या मोठ्या क्षेत्राची निगराणी ठेवण्याकरिता पीएमआरडीए कार्यालयाकडून DGPS तसेच CORS असलेले अद्यावत तंत्रज्ञान असलेले ड्रोन खरेदी करण्यात आले आहे. अशी माहिती उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे. (PMRDA NEWS)
अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंघला यांचे हस्ते उद्घाटन
अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंघला यांचे हस्ते आज शुक्रवारी (ता.२१) उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्र शासन तसेच राज्य शासनातील विविध विभागातील मान्यवराचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रचे (MRSAC)वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील , पुणे येथील सर्वे ऑफ इंडियाचे सर्व्हेअर अधीक्षक एस. त्रिपाठी, पुणे जिल्हा भूमी अभिलेखाचे अधीक्षक सुर्यकांत मोरे, पुणे नगर रचना विभागाचे सह संचालक राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रामदास जगताप म्हणाले की, नगर रचना योजनांची आखणी व विकास, नदी सुधार प्रकल्प, रस्ते रुंदीकरण व सुविधा क्षेत्राचे हस्तांतर , अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण या साठी पीएमआरडीए नविन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणार आहे. असे जगताप यांनी सांगितले आहे.
दरम्यान, DGPS तसेच CORS या अद्यावत तंत्रज्ञान असलेला ड्रोन अधिक कार्यक्षम पद्धतीचा असून पीएमआरडीए कार्यालयामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अद्यावत करण्यात आलेले आहेत. पीएमआरडीए कार्यालयातील ड्रोन कक्षाकरीता विशेष कौशल्य असलेले तज्ञ व्यक्तीची नेमणुका करण्यात आली असून सदरील कक्ष उप जिल्हाधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी रामदास जगताप यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असून व या कक्षात मुख्य भौगोलिक माहिती तज्ञ डॅा. प्रितम वंजारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
PMRDA News : वाल्हेकरवाडी येथील पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील २० दुकानांचे ई-लिलाव होणार…!
मुळशी तालुक्यातील जांबे येथील अनाधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा…!