Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला ३५१ कोटींचा ढोबळ नफा : अजित पवार…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 19:43

पुणे : Ajit Pawar – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला (पीडीसीसी) आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेर ३५१ कोटी ३९ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला असून अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) शून्य टक्के असल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. (Ajit Pawar) बँकेचा एनपीए गतवर्षीच्या ४.७६ टक्क्यांवरुन कमी होऊन ३१ मार्च २०२३ अखेर ४.५१ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचेहि पवार यांनी स्पष्ट केले.  (Ajit Pawar) जिल्हा बँकेच्या मार्च अखेरच्या विनालेखापरिक्षणाच्या सांपत्तिक स्थितीबद्दल शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  (Ajit Pawar)

भिमा पाटस कारखान्यावर रीतसर कायदेशिर कारवाई होणार..

पवार म्हणाले की, जिल्हा बॅकेच्या एकूण ठेवी ११ हजार ४८१ कोटी ४९ लाख रुपयांच्या झाल्या असून गेल्या वर्षभरात ९१ कोटी ८९ लाख रुपयांनी ठेवींमध्ये वाढ झाली आहे. बॅकेने मार्च अखेर ७ हजार ९७४ कोटी ३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बॅकेने केलेली एकूण गुंतवणूक ७ हजार ७९२ कोटी ४७ लाख रूपये असून गतवर्षाच्या तुलनेत त्यामध्ये ८.७६ क्क्यांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्ड येथील भूविकास बॅकेचा ३५ हजार चौरस फुटाचा भूखंड जिल्हा बॅकेने २६ कोटी ७१ लाख रूपयांना विकत घेतला आहे. या ठिकाणी बँकेचे सहकार शिक्षण-प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मनोदय आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांच्यासह बँकेचे संचालक व आमदार दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, रमेश थोरात, प्रवीण शिंदे, सुरेश घुले, भालचंद्र जगताप आणि बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध देसाई उपस्थित होते.

 

… तर भिमा पाटसवर रीतसर कायदेशिर कारवाई

दौंड तालुक्यातील भिमा पाटस सहकारी कारखान्याकडून जिल्हा बँकेला सुमारे १०० कोटींहून जास्त रक्कम वसूल पात्र आहे. या कारखान्यावर राज्य सहकारी बॅकेचेही कर्ज आहे. कर्नाटकातील ज्या कंपनीना हा कारखाना चालवायला घेतला आहे, त्या बँकेचे महाराष्ट्र कार्यक्षेत्र नसल्याने पैशाची अडचण आल्याचे सांगण्यात येत आहे. भिमा पाटसकडून जिल्हा बँकेला थकीत पैसे आले नाहीत, तर संचालक मंडळ रीतसर कायदेशीर कारवाई करेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

सहकारच्या मान्यतेनंतर रखडलेली नोकरभरती होणार

शेतकर्‍यांना २० रुपयांत सात बारा देण्यास सुरुवात झाली असून ग्राहकांना जून महिन्यात गुगल पे सुविधा देण्यात येणार आहे. क्यूआर कोड, एसएमएसच्या सुविधेसह लवकरच व्यवसाय वाढीसाठी बिझनेस करस्पॉण्डट नेमले जातील. सहकार विभागाच्या मान्यतेनंतर देण्यात येणार्‍या एजन्सीद्वारे रखडलेली नोकरभरती केली जाणार आहे. विकास सोसायट्यांच्या आर्थिक अडचणीत त्यांच्या अनिष्ठ तफावतीमध्ये आर्थिक मदतीसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली असून जिल्हयातील क्षारपड जमीनीच्या सुधारण्यासाठी एकरी ९६ हजार रूपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचे पत्र : ‘ही’ केली मागणी…

Ajit Pawar : राज्याची सत्तासमीकरणे पुन्हा बदलण्याची चर्चा, अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार ?

Ajit Pawar : गिरीश बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, निवडणूक लढण्याची एवढी कसली घाई ; अजित पवारांनी विजय वडेट्टीवार यांना फटकारले..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

PMRDA NEWS : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाचे ड्रोन तंत्रज्ञान झाले अधिक अत्याधुनिक : उप जिल्हाधिकारी रामदास जगताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.