Pimpri News : पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १५ लाख ४० हजारांच्या २२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ओंकार दिलीप गवारे आणि महेश महादेव दनाने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
वाकड पोलिसांची कामगिरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून शहरात पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरी करणारे आरोपी गवारे आणि दनाने हे थेरगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली.(Pimpri News) त्यांना सापळा रचून वाकड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी २२ गुन्हे केल्याचं कबूल केले. आरोपीकडून १५ लाख ४० हजारांच्या एकूण २२ दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, गुन्हे पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, (Pimpri News) चव्हाण, बीभीषण, इनामदार, काळे, गिरे, गवारी, साबळे, खेतल, अतिक शेख, शिमोन चांदेकर, तात्या शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News: भाजपा युवा मोर्चातर्फे ‘मोदी@9 जनसंपर्क अभियान’ची प्रभावी अंमलबजावणी…
Pimpri News :पिकनिकचा आनंद काळाने हिरावला; वॉटरपार्कमध्ये पाण्यात बुडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू