Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्यातील जवानानेच सासूवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गर्भवती पत्नीला दवाखान्यात दाखल करून घरी आल्यावर जावायाने हे कृत्य केले आहे. (Mother-in-law raped by an Indian Army jawan in Sangvi)
औंध मिलिटरी स्टेशन कर्मचारी वसाहतीतील घटना
याप्रकरणी ४० वर्षीय सासूने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून २५ वर्षीय जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri News) औंध मिलिटरी स्टेशन कर्मचारी वसाहतीत मागील आठवड्यात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. औंध येथे हा जावई सध्या नियुक्तीला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी गर्भवती असून, बाळंतपणासाठी ती जावयाच्या घरी आली होती. आरोपी जावयाने पत्नीला बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.(Pimpri News) त्यानंतर तो घरी आला होता. तेव्हा त्याने सासूवर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास सदर महिलेला आणि तिच्या गर्भवती मुलीला ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तक्रारदार पीडित सासू गुरुवारी (दि. ८) सांगवी पोलिसांकडे गेली.
आर्मी कर्मचारी वसाहतीत आवश्यक तो बंदोबस्त २४ तास तैनात असतो. त्याचबरोबर जेव्हा घटना घडली तेव्हा घरात अन्य नातेवाईक होते का, याची पडताळणी सध्या पोलिसांकडून केली जात आहे. (Pimpri News) कर्मचारी वसाहतीत मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारदार सासूचे म्हणणे आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.