Pimpri News : पिंपरी : झोपडपट्टीमध्ये भौतिक सेवा-सुविधा मिळाव्यात, शाश्वत विकास व्हावा, यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील ८ झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण हाती घेतले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे पुरविण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून वस्त्यांमधील प्रत्येक घराला ‘गुगल प्लस कोड’ देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
झोपडपट्ट्यांच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न
महापालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग आणि शेल्टर असोसिएट्स यांच्यातर्फे आठ झोपडपट्ट्यांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सर्वेक्षण केले जात आहे. (Pimpri News) त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पायाभूत सेवासुविधा अधिक सक्षमपणे उभारणे, नागरिकांना वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे, जलःनिसारण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, आरोग्य वैद्यकीय सेवा, अभ्यासिका असे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
कुटुंबाचे सर्वेक्षण जीआयएसच्या माध्यमातून प्रत्येक घर क्रमांक देऊन केले जाईल. कुटुंबाची माहिती, घर व शौचालय स्थिती, कचरा व्यवस्थापन आदी माहिती संकलित केली जाणार आहे. वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारणे, युवक-युवतींना तांत्रिक शिक्षण देणे, वैद्यकीय व आरोग्य सेवा दिली जाणार आहे. (Pimpri News) पहिल्या टप्प्यात रमाबाईनगर, रामनगर (आकुर्डी), गवळीमाथा (भोसरी), संजय गांधीनगर (मोशी), शांतिनगर (भोसरी), शास्त्रीनगर (पिंपरी), काटेवस्ती (दापोडी), संजयनगर (वाखारेवस्ती) या आठ झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पिंपरी-चिंचवड महापालिका झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले की, झोपडपट्टीमधील भौतिक सेवा-सुविधा, शाश्वत विकासासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. प्रत्येक घराला क्रमांक देऊन कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. (Pimpri News) पहिल्या टप्प्यात आठ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याला झोपडीवासीयांनी सहकार्य करावे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : जिल्ह्यात शुक्रवारपासून वृक्षालय अभियानाचा शुभारंभ
Pimpri News : “जनसंख्या वाढली पण माणूस हरवत चालला आहे!”:समाजसेवक अण्णा हजारे