Pimpri News : पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव राज्यभरात पसरले आहे. या ना त्या कारणावरून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी ही अनेक वेळा चर्चेचा विषय ठरली आहे.गौतमीच्या कार्यक्रमावरुन काही ना काही गोंधळ होणार हे ठरलेलंच असतं. कधी गौतमीत्या कार्यक्रमात गोंधळ तर कधी गौतमीवर होणारे आरोप हे समीकरण आता तयार झाले आहे. (Pimpri News) दरम्यान असाच एक प्रकार पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मधून समोर आला आहे. चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या निमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले म्हणून आयोजकावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे. बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल शहरात एकच चर्चा झाली आहे. (Due to Gautami Patil’s program birthday boy has to face police case)
कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित शंकर लांडे यांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रमाचे जाहीर आयोजन केले होते. (Pimpri News) सोमवारी पिंपरी- चिंचवडकरांना गौतमी पाटीलने काही भन्नाट गीतांवर ताल धरून दिलखेच अदांवर तरुण- तरुणींना घायाळ केलं. असं असताना आता कार्यक्रम होऊन गेल्यावर आयोजक म्हणजेच बर्थडे बॉयवर मात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली असताना घेतला कार्यक्रम
अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून भोसरी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली. (Pimpri News) याप्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रेय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून भोसरी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली. (Pimpri News) तरी देखील आयोजक अमित लांडे यांनी सोमवारी गौतमी पाटीलचा जाहीर कार्यक्रम घेतला म्हणून आता थेट आयोजक असलेल्या बिर्थडे बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : तळवडेतील धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत ; गणेशनगर- ज्योतिबानगरमध्ये कामाला सुरूवात
Pimpri News : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान!
Pimpri News | चिडलेल्या आईने बांबूने बेदम मारहाण केल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू…