Pimpri Crime | पिंपरी, (पुणे) : रस्ता ओलांडताना खाऊ आणण्यासाठी दुकानात निघालेल्या ७ वर्षाच्या मुलाला एका बिल्डरच्या भरधाव कारने धडक दिली. या धडकेत मुलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.
शिवाजी रावसाहेब काकडे (वय ७) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी रावसाहेब अण्णा काकडे (४१, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कारचालक असलेल्या अनिल बांगडिया (वय-५६) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या भरधाव कारने सात वर्षीय मुलाला धडक दिली. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला. तर कारचालक आरोपी याला तेथील नागरिकांनी मारहाण केली. या मारहाणीत आरोपी जखमी झाला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी संबंधित आरोपीची गाडी जप्त केली असून तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ करीत आहेत.