Pimpri Chinchwad News | पुणे : पिंपरी-चिंचवड ( Pimpri Chinchwad )महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागातील एका ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेल्या झालेल्या लिपिकाला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
दिलीप आडे असे निलंबित करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागात दिलीप भावसिंग आडे हा अनुरेखक (लिपिक) या पदावर काम करत होता.
काय आहे प्रकरण…
पाणी पुरवठा विभागातील एका ठेकेदाराकडून मंजूर निविदेच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी १ लाख 5 हजार रूपयांची लाच मागितली. तडजोड करुन १ लाख रोख घेताना आडेला 21 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेत रंगेहाथ पकडले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांनी दिला आदेश…
त्यानंतर शुक्रवारी आडेला पालिका सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची आडेच्या सेवा नोंद पुस्तकात नोंदही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Corona Update | पुणेकरांनो काळजी घ्या, मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची पुण्यात नोंद
Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग