पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या 48 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर 48 तासात 176 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील पाच वर्षांतील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे
सलग 48 तास पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी शहर जलमय झाले आहे. तर, महापालिकेने केलेल्या कामाची पोलखोल होत आहे.
पिंपरी- चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. 48 तासात 176 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील पाच वर्षातील हा सर्वाधिक पावसाची झाली आहे. पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आपत्कालीन पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित सहकार्य करत आहेत.