पिंपरी-चिंचवड: मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना समोर आली होती. यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. मंदिरातील देवीच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्यांव कडक कारवाईची मागणीने नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेआज मुळशी बंदच्या हाक देण्यात आल्यानंतर पौडमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन या बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे.
पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची एका युवकाने विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दिलेल्या फिर्यादिवरून मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान चाँद नौशाद शेख हा तरुण नागेश्वर मंदिरात आला होता. त्याने अन्नापुर्णा देवीची मुर्ती देवळातून खाली घेवून तिची विटंबना केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी आज पौडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. याप्रकरणी चाँद शेख व नौशाद शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.