Big News : पिंपरी : मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पावर बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे विभागाने सोमवारी रात्री अटक केली. बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून बांगलादेशी नागरिक भारतात वास्तव्य करत असल्याचे यानिमित्ताने उघडकीला आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय महादेव दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून भारतात वास्तव्य
दरम्यान, अटक केलेल्या नागरिकांकडून बांगलादेशी चलन, भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त केले आहे. सुकांथा बागची (वय २१), नयन बागची (वय २२) आणि सम्राट बाला (वय २२, तिघे मूळ रा. ग्राम बहादुरपूर, दतोकन्दवा, जिल्हा मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. (Big News ) तिघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे.
मोशीतील बो-हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. येथे बिहार, उत्तरप्रदेशमधील मजूर काम करतात. त्यांच्यासोबत तीन बांगलादेशीही वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. (Big News ) या माहितीच्या आधारे खातरजमा केल्यानंतर तिघे मूळ बांगलादेशी असल्याचे समोर आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी दिली
या तीनही बांगलादेशी नागरिकांनी कोलकत्ता येथून नऊ महिन्यांपूर्वी बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड बनविले होते, अशी माहिती मिळाली. सुकांथा, नयन बागची हे २३ जुलै २०२३ रोजी तर सम्राट हा ६ ऑगस्ट रोजी मोशीतील लेबर कॅम्प येथे वास्तव्यास आला होता. (Big News ) तिघेही घुसखोरी करुन भारतात आले आहेत. त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मराठा आरक्षण नाही, तोपर्यंत मतदान नाही; अतीट ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय