पिंपरी- चिंचवड : सध्या लग्नसराई सुरु आहे. सर्वत्र लग्नाचे बार उडताना दिसत आहेत. अनेक लग्नामध्ये नाचणारी मंडळी लक्ष वेधून घेत असतात. तर दुसरीकडे वेगवेगळ्या कारंणाने अनेक लग्न चर्चेचा विषय ठरतात, अशातच आता पिंपरी- चिंचवडमध्ये सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. मामाने भाचाला तब्बल १ हजार ३७५ गुलाबांचा पुष्पगुच्छ दिला आहे.
यामुळे या विवाहाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. याआधी देखील दीपक हरके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील १ हजार ३६९ गुलाब पुष्पांचा गुच्छ दिला होता. असेच आता देखील केवळ हौस म्हणून मामाने भाच्यासाठी हा गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला आहे. यामुळे या विवाहाची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.
हौस ही मोठी गोष्ट असते, म्हणतात ना हौसेला मोल नसतं. पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये असंच काहीसं चित्र बघायला मिळालं आहे. नीरज घोंगडे आणि प्रतीक्षा उडगे यांचा ३१ डिसेंबरला दुपारी विवाह संपन्न झाला. हा विवाह सोहळा अस्मरणीय करण्यासाठी आणि हौस म्हणून मामा दीपक हरके यांनी भाचा नीरज घोंगडे याला भला मोठा गुलाब पुष्पचा गुच्छ भेट दिला.
हा कुठला छोटा- मोठा गुच्छ नव्हता तर तब्बल १ हजार ३७५ गुलाबाचा गुच्छ होता. तो दोघांनी उचलून नवरदेव नीरज आणि त्याची पत्नी प्रतीक्षाला दिला आहे. हा गुच्छ बनवण्यासाठी दीपक हरके यांना एक दिवस लागला आहे. याआधी देखील हरके यांनी अशाच प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भलामोठा गुलाब पुष्प दिला होता.