पिंपरी, (पुणे) : पिंपरी- चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलाने अभ्यासासाठी आई रागावली म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे. तेरा वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जतीन सोमनाथ कुदळे असं आत्महत्या केलेल्या मुलाच नाव आहे. जतीन इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता.
जतीन अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली. याच रागातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जतीनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना ३१ जानेवारीची असून १ फेब्रुवारीला जतीनचा मृत्यू झाला आहे.
आई रागावल्याने उचललं टोकाचं पाऊल
पिंपरी- चिंचवडमध्ये आईने मुलाला अभ्यास करण्यावरून रागावल्याने आत्महत्या केली आहे. जतीन सोमनाथ कुदळे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जतीनची आई त्याला अभ्यास करण्यावरून रागावली होती. त्यानंतर त्याची आई मुलीला ट्यूशनला सोडायला गेली. याच दरम्यान जतीन एकटा असताना घराचा दरवाजा बंद करून गळफास घेतला.
या वेळेत वडील घरी आले, समोरील दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद येत नसल्याने पाठीमागील दरवाजाच्या सापटीतून पाहिलं. तेव्हा मुलाने गळफास घेतल्याच वडिलांना दिसलं. वडिलांनी तातडीने दरवाजाच्या आतून हात घालून कडी उघडून जतीन ला तात्काळ महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारादरम्यान जतीन चा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.