पुणे : बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी राज्यात १७ गैरप्रकार उघडकीस आले आहे. सर्वाधिक गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली असल्याची माहिती आहे.
राज्य मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक सात गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली. तर नागपूर आणि औरंगाबाद विभागात प्रत्येकी तीन, अमरावती आणि लातूर विभागात प्रत्येकी एक नाशिक विभागात दोन गैरप्रकार आढळून आले.
दरम्यान, राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारी (ता. २१) सुरू झाली. तसेच या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. यानुसार विभागीय मंडळ, विधिकारी स्तरावर भरारी आणि बैठे पथकाची प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्यवस्था, परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरातील छायाप्रतीची दुकाने बंद केली जातील.
तसेच सहायक परीरक्षकाने जीपीएसद्वारे ट्रैकिंग आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, परीक्षेच्या पाहिल्याच दिवशी राज्यभरात १७ गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.