-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : मागील काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली. दरम्यान आता या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 29 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या 448 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मैदानी चाचणी 9 ते 27 जुलै या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, संततधार पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली.
ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवारांनी आपल्याला महाआयटी विभाग, मुंबई यांच्याकडून देण्यात आलेले पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.