विशाल कदम
लोणी काळभोर : Msedcl News – फुरसुंगी (ता. हवेली) येथील एका बड्या गृहप्रकल्पातून महावितरणने तब्बल २२ केव्हीची केबल उघड्यावरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Msedcl News) महावितरण आणि बिल्डरमध्ये विद्युत पुरवठ्याचे काम कोणी करायचे यावरून तब्बल ६ महिन्यांपासून वाद सुरु आहे. (Msedcl News) मात्र या दोघांच्या वादात १ हजारहून अधिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. (Msedcl News) या प्रकारामुळे महावितरण आणि बिल्डरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर भविष्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Msedcl News)
फुरसुंगी येथील ”ग्रीन हाइव्ह प्लस” या गृहप्रकल्पातील घटना
फुरसुंगी येथील हरपळे वस्तीत ”ग्रीन हाइव्ह प्लस” या नावाने एक मोठा गृहप्रकल्पात आहे. या गृहप्रकल्पातील २ इमारतीत १ हजाराहून अधिक नागरिक राहतात. या इमारतीतून जमिनीखालून केबल (विद्युत वाहिनी) गेली होती. मात्र काही कालावधीनंतर या गृहप्रकल्पातील केबल बस्ट झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात इतर ठिकाणाहून कनेक्शन देऊन पुन्हा विद्युत पुरवढा सुरळीत केला.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
महावितरणाने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केबल उघड्यावरून नेली होती. त्यावेळी महावितरणचे अधिकारी आणि बिल्डरला यांच्यात केबल टाकण्यावरुन वाद झाला होता. सोसायटीतील जागेतून केबल बिल्डरने जमीनीतून टाकून द्यावी. अशी भूमिका महावितरणाने मांडली होती. तर बिल्डरने हे काम तुम्हीच करा. असा अट्टाहास धरला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून केबल उघड्यावर आहे. अशी माहिती सोसायटीतील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात केबल बस्ट अथवा शाॅर्ट सर्किट झाले तर मोठा अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी बिल्डर आणि महावितरणच्या लोणी काळभोर व फुरसुंगी येथील अधिकाऱ्यांकडे केबल जमिनीखालून नेण्यात यावी. यासाठी नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. नागरिकांनी यासंदर्भात महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना झाली नाही. एखादी मोठी दुर्घटना घडली तरच महावितरण आणि बिल्डरला जाग येणार आहे का ? असा संतापजनक सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, एकीकडे महावितरण प्रशासन वाढीव वीज बिल आकारून सर्वसामान्य नागरिकांना झटका देत आहे. तर दुसरीकडे सुविधांच्या बाबतीत मात्र, महावितरण अधिकारी व बिल्डर ढिसाळ करभार करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. महावितरण व बिल्डरने वेळीच यावर योग्य ती उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
MSEDCL : महावितरणचा वीज ग्राहकांना ”शॉक” ; घरगुती वीजदरात तब्बल १० टक्के दरवाढ…!