यवत Msedcl News : शेतकरी बांधव व इतर विद्युत ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी केडगाव (ता. दौंड) येथे आयोजित केलेला ग्राहक तक्रार निवारण दिन बुधवारी (ता. ११) संपन्न झाला आहे. (Msedcl News)
ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ,केडगाव विभाग,अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड- शिरूर, ग्राहक कल्याण फाउंडेशन दौंड यांच्या वतीने करण्यात आले होते.
दौंड व शिरूर तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या समस्या
दौंड व शिरूर तालुक्यातील अनेक ग्राहक विद्युत वितरणासंबंधी समस्या घेऊन सकाळी ११ वा. उपस्थित होते. परंतु कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके उपस्थित नसल्याने बैठक दुपारी १२ वाजता सुरू झाली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता केडगाव विभाग किशोर शिंदे यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. अनेक तक्रारी बाबत तात्काळ संबंधित यांना फोन करून निवारण केले.
अनेक ठिकाणी रोहित्राची मागणी होत असून ऑइल उपलब्ध होत नसल्याने रोहित्र देण्यासाठी उशीर होत असल्याचे यावेळेस नागरिकांनी अभियंता राजेंद्र एडके सांगितले. मीटर मिळत नसल्याबाबत ग्राहकांची तक्रार असल्याने 1000 मीटर आले असून लवकरच त्याचे वितरण केले जाईल. असे एडके यांनी सांगितले.
यावेळी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ,कोंढापुरी, मांडवगण फराटा ,रांजणगाव सांडस तर दौंड तालुक्यातील आलेगाव, गार, वरवंड, यवत , केडगाव येथील ग्राहकांनी विद्युत वितरण बाबत आपल्या तक्रारी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मांडल्या.
दरम्यान, यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक कल्याण फाउंडेशन दौंड तालुका यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन किशोर शिंदे यांना देण्यात आले. अनेक कार्यालयात ग्राहक हक्क सनद लावण्याची व तालुकास्तरावर ऊर्जा बैठक घेण्याची मागणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला महावितरण विभागाचे केडगाव उपविभाग उपकार्यकारी अभियंता कटके, असिस्टंट टेंगले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष नामदेव होले, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे मारुती पठारे, अनिल नेवसे यांसह अनेक पदाधिकारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमनाथ सोडनवर यांनी महावितरण अधिकारी व उपस्थितांचे आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
MSEDCL : महावितरणचा वीज ग्राहकांना ”शॉक” ; घरगुती वीजदरात तब्बल १० टक्के दरवाढ…!