Mobile Found Again In Yerawada Jail : पुणे: येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात काही दिवसांपूर्वी एक मोबाईल सापडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा एका कैद्याकडे मोबाईल मिळाला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अश्विन आनंदराव चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे.
याबाबत तुरुंग अधिकारी अमोल जाधव (वय ३७, रा. लोहगाव) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. (Mobile Found Again In Yerawada Jail) हा प्रकार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक एक, बॅरेक क्रमांक एकमध्ये शुक्रवारी रात्री दोन वाजता घडला.
खून प्रकरणातील आरोपीकडे सापडला मोबाईल…
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा गोळीबार करुन योगेश जगताप याचा खून केल्याप्रकरणात अश्विन चव्हाण याच्यासह तिघे फरारी होते. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्यांनी चाकण परिसरातील कोये येथे गोळीबार केला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपीच्या अंगावर तेथील झाड फेकून मारले होते. त्यात अश्विनसह तिघांना अटक केली होती. त्यात त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
बॅरेक क्रमांक एक मधील खिडकी क्रमांक २ मध्ये मध्यरात्री २ वाजता सुरक्षा रक्षकांना एक मोबाईल आढळून आला…
त्यात बॅटरी व सीम कार्ड आढळून आले. (Mobile Found Again In Yerawada Jail) कारागृहात बंदी असतानाही हा मोबाईल अश्विन चव्हाण याने आणला असल्याचे दिसून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : जनरेटर चोरणाऱ्या तीन भामट्यास गुन्हे शाखेने केली अटक
Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या