संदीप टूले
MLA Rahul Kul News : दौंड आमदार राहुल कुल यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चांना दौंड परिसरात उधाण आले आहे. या वेळी कुल यांचा मंत्रिमंडळात समावेश होणारच अशी खात्री छातीठोकपणे त्यांचे समर्थक देत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राहुल कुल यांच्या नागपूर भेटीची चर्चा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे व पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या नियोजित दौऱ्यामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांनतर काहीच दिवसात परत एकदा राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते. ८ दिवसात २ वेळा भेटीमुळे दौंडमध्ये तालुक्यामध्ये राहुल कुल यांना मंत्रीपद मिळणार का ? या चर्चेला परत एकदा उधाण आले आहे. (Will MLA Rahul Kul be a minister? Discussions sparked in Daund…)
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. (MLA Rahul Kul News) आमदार कुल हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील आमदार म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील आणि थेट पवारांना आव्हान देणारे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार कुल हे असून यांना मंत्रीपद मिळाल्यास तालुक्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
राज्यात अनेक वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना मंत्रीमंडळात पुणे जिल्ह्यातील बारामती, खेड इंदापूर, या तालुक्यांना नेहमी संधी मिळाल्याने दौंड तालुक्याला मात्र मंत्रीपदापासून नेहमीच वंचित राहावे लागले. याचे शल्य तालुक्याला आहे. यापूर्वी सुभाष कुल, रंजना कुल यांना मंत्रीपदाची संधी होती. मात्र, बारामतीकरांमुळे ते मिळू शकले नाही, असा आरोप कुल यांचे कार्यकर्ते करत असतात.
सन २०१४ साली कुल यांनी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी मिळवून पवारांच्या विरोधात दंड थोपटून तालुक्यातील जनतेला स्वाभिमानी दौंडकरची हाक देत विजयश्री खेचून आणली. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्याने घटकपक्ष रासपचे एकमेव आमदार राहुल कुल यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असे चित्र निर्माण झाले. (MLA Rahul Kul News) पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी दौंड तालुक्याला लालदिवा मिळणार, असे विधान केल्याने चर्चेला आणखी उधाण आले. पण मंत्रिमंडळात फक्त जानकर यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला, त्यामुळे तालुक्याला मंत्रीपदाने पुन्हा हुलकावणी दिली.
पाच वर्ष मंत्रीपदासाठी अनेक वेळा चर्चा होऊनही ते मिळाले नाही. दरम्यानच्या काळात आमदार राहुल कुल यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवत त्यांचे निकटवर्तीय म्हणून स्थान मिळवले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता येऊन मंत्रीमंडळात स्थान मिळेल, त्यामाध्यमातून अडचणीतील कारखाने व इतर प्रश्न सुटतील, या आशेने कुल यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची हवा असतानाही निसटत्या मतांनी कुल यांनी विजय मिळवला. (MLA Rahul Kul News)
या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला जास्त जागा मिळाल्याने युतीचे सरकार येऊन जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार म्हणून कुल यांचा समावेश मंत्रीमंडळात निश्चित मानला जात होता. (MLA Rahul Kul News) मात्र, अनेक घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्र पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि कुल यांची मंत्रीपदाची संधी पुन्हा मावळली.
त्यामुळे दौंड तालुक्याला कुल यांच्या रूपाने पहिल्यांदा मंत्री मिळेल, या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान, आता फक्त प्रतीक्षा, ‘मी राहुल सुभाष कुल, मंत्रीपदाची शपथ घेतो की हे शब्द ऐकण्याची आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राहुल कुल यांचा मंत्रीमंडळात समावेश नक्की आहे, अशी चर्चा दौंड तालुक्यात रंगली आहे. (MLA Rahul Kul News) मंत्रीमंडळात समावेश होणारच असे त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड येथे दहावीच्या मुलीची भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या ; परिसरात हळहळ..
Daund News : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..