योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी यांच्या घरासमोरील पढवीत एका अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 4 सप्टेंबर रोजी शिरूर येथी आलेगाव पागा येथे घडली आहे. या प्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ गजाआड केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे अल्पवयीन पीडितेस मी तुझे आजीला नाव सांगेन अशी धमकी देऊन तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी अशोक सोनवणे याच्यावर बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गीरी करत आहे.