Maval News : मावळ, (पुणे) : पवन मावळातील चावसर गावच्या हद्दीतील पवना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी (ता. २) सायंकाळी धरणात बुडून एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(40-year-old man drowned in Pavana Dam; Incident in Chavsar village in Pawan Mavla..)
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
लक्ष्मण बबन साठे (वय ४०, रा. साठेसाई, ता. मुळशी, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लक्ष्मण साठे हे पवन मावळ परिसरातील चावसर गावात आपल्या बहिणीकडे कामानिमित्त आले होते. (Maval News) यावेळी जवळच असलेल्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पोहण्यासाठी ते गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
अंधार पडल्याने मृतदेहाचा शुक्रवारी शोध घेता आला नाही. शनिवारी सकाळी वन्यजीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. (Maval News) मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिस हवालदार सचिन कदम, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, अमित गुरव, गणेश ढोरे, रमेश कुंभार आदींनी परिश्रम घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भीमाशंकर येथे निघालेल्या पत्रकाराच्या धावत्या कारने घेतला पेट