Manchar News : मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ला सत्र सुरुच आहे. लौकी येथे सोमवारी रात्री तब्बल पाच ठिकाणी बिबट्याने हल्ला केला असून, त्यात एक वासरू ठार झाले. तर पाळीव कुत्रे, दोन शेळ्या व एक मेंढी जखमी झाली आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.
दिवसाही घराबाहेर पडणे धोकादायक
मिळालेल्या माहितीनुसार लौकी येथे बिबट्याने एकाच रात्री पाच ठिकाणी हल्ला केला आहे. गावठाणात समाधान सुरुसे यांचे घर आहे. घराजवळच गोठा असून संपूर्ण बंदिस्त आहे. सर्वप्रथम बिबट्याने सुरुसे यांच्या गोठ्यातील वासरू ठार मारून ओढत नेले आहे. त्यानंतर शामराव थोरात यांच्या घरासमोर बसलेल्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. (Manchar News )जवळ असलेल्या सुभाष मारुती थोरात यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. तसेच मेढपाळ तान्हाजी सूळ यांच्या शेळी व मेंढीलाही बिबट्याने जखमी केले आहे. दरेकरवस्ती येथे हरिभाऊ लक्ष्मण वाघ यांनी शेळी घरात बांधली होती. भिंतीला असलेल्या छोट्याशा जागेतून बिबट्याने घरात प्रवेश करून शेळीच्या मानेवर हल्ला करून तिला जखमी केले आहे.
काळेमळा येथे कैलास थोरात यांना कुत्रे जोरात भुंकत असल्याने जाग आली. त्यावेळी त्यांना बिबट्या शेळ्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ घरातील इतर नागरिकांना जागे करून आरडाओरडा करून प्रतिकार केला. त्यामुळे शेळ्यावरील बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यात त्यांना यश आले. (Manchar News ) वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात दिवसही घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Manchar News : पाऊस न पडल्याने बाजारपेठेतील अर्थकारण मंदावले – माजी सभापती देवदत्त निकम
Manchar News : निवृत्त पोलिसाची हत्या करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या