Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणेकरांनो सावधान! स्वस्तात गॅजेट घेताय, महाग पडतील! गॅजेटमधून साबण विकणारी टोळी सक्रीय…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 June 2023, 9:30

Pune News पुणे : स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू पटकन खरेदी केल्या जातात. पण आता सावध व्हा… मोबाईल किंवा पॉवर बँक मिळत असेल, तर यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. मागील काही दिवसांत शहर परिसरात अनेकांची फसवणूक झाली आहे. (Pune News)  मोबाईलसोबत देण्यात आलेले बिल बनावट तर, पॉवर बँकमध्ये चक्क साबणाच्या वड्या असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर मिळणारे स्वस्तातील गॅजेट्स महागात पडत असल्याचे चित्र आहे. (Pune News)

पैशांची बचत करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहक मोठ्या दुकानात जाण्यापेक्षा पथारीवर, रेल्वे स्टेशन, बस थांबे, एसटी स्टॅन्ड, मोठ्या बाजारपेठा येथे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना पसंती देतात. याचा फायदा घेत काही भामट्यांनी पैसे उकळण्यासाठी नवा उद्योग सुरू केला आहे. बनावट बिल देऊन मोबाईल गळ्यात मारले जात आहेत. तसेच, पॉवर बँकच्या नावाखाली साबण भरलेला प्लास्टिकचा डब्बा हातात टेकवल्याचे काही प्रकरणांमधून समोर आले आहे.

दरम्यान, रस्त्यावर विक्री केले जात असलेल्या पॉवर बँकच्या बॉक्सवर नामांकित कंपन्यांचे लोगो असतात. ज्यामुळे ग्राहकांना भुरळ पडते. किंमतही कमी असल्याने ग्राहकांना चांगला डिस्काउंट मिळाल्याचा फील येतो. यातील विशेष म्हणजे पॉवर बँक तपासून दिली जाते. यामध्ये एक छोटी बॅटरी असते. ज्यामुळे मोबाईल चार्जिंग होत असल्याचे दिसते. घरी गेल्यानंतर दोनच दिवसांत पॉवर बँक बंद पडते. दुरुस्तीसाठी पॉवर बँक दुकानात नेल्यानंतर आतमध्ये साबण असल्याचे समोर येते. त्यानंतर मात्र ग्राहकाकडे कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

 

पैशांची गरज असून अर्जंट गावी जायचे आहे, आई आजारी आहे, त्यामुळे मोबाईल विकायचा आहे, असे सांगून मोबाईल गळ्यात मारला जातो. वीस हजार किंमत असलेला नवा मोबाईल अवघ्या चार-पाच हजार रुपयांत दिला जातो. त्यासोबत बॉक्स, खरेदीची जीएसटी असलेले बिलही दिले जाते. त्यामुळे नागरिकांना संशय येत नाही. ज्या वेळी मोबाईलला काही प्रॉब्लेम येतो तेव्हा संबंधित दुकानाचे बिल दाखवल्यानंतर बिल बनावट असल्याचे काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे मोबाईल सोबत बिलही असले तरीही खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पालखी सोहळ्यासाठी आळंदी परिसरात दाखल झालेल्या वारकऱ्यांनादेखील अशा प्रकारची पॉवर बँक देण्याचा प्रकार समोर आले आहेत. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पॉवर बँकमध्ये साबण असल्याचे पोलिस तपासणीत उघड झाले होते. रस्त्यावर महागड्या वस्तूंची खरेदी करू नये. ज्या दुकानाच्या नावाचे बिल असेल, त्या दुकानात जाऊन खातरजमा करावी. रस्त्यावर मोबाईल विक्री करणारे आढळून आल्यास नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Film News : अभिनेता राजकुमार रावने श्रद्धा कपूरसोबत शेअर केला सेल्फी; 'स्त्री 2'बाबत दिली 'ही' हिंट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.