शिरूर : शाळेच्या इमारतीचे प्लास्टर करताना दुसऱ्या मजल्यावरुन तोल गेल्याने खाली पडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. अखिलेश कुमार (वय ४५ मुळ रा. अखिलेश राय, मुन्दिपुर, सिवान, बिहार, सध्या रा. बाबुराव नगर ता. शिरुर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. सदर घटना थापेमळा (ता. शिरुर) येथे गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीचे प्लास्टर सुरु असताना मंगळवारी (दि.२२) पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत टुनटुन पंडित (वय ३३ रा. थापे मळा ता. शिरुर जि.पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अखिलेश कुमार याचा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर हे करीत आहेत.