पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि कुख्यात गुंड गणेश मारणेला (संगमनेर परिसरातून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गणेश मारणेचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. गणेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याच्या मागावर पुणे गुन्हे शाखेचे पोलिस होते. पोलिसांनी त्याचा नाशिक येथून पाठलाग सुरू केला. एकूण 3 पथके गणेश मारणेचा पाठलाग करीत होते. अखेर त्याला संगमनेर परिसरातून ताब्यात घेतले आहे. मारणेसह त्याच्या साथीदारांना देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचार्यांनी ही कामगिरी केली आहे.