विजय लोखंडे
वाघोली : पूर्व हवेली तालुक्यातील शेतकरी वर्ग हा वीज वितरण खात्याच्या निगडित अवलंबून असतो. कारण पिकांना पाणी देण्यासाठी वीज असणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजेबाबत अनेक समस्या पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उद्भवल्या असून, त्या सर्वच विजेच्या समस्या महावितरणने लवकरात लवकर सोडवाव्यात, अशा मागण्यांचे निवेदन वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष अध्यक्ष संदिप गोते यांनी मागणी केली.
ॲडिशनल डिपी मिळणे, जुन्या डीपी यांच्या दुरुस्ती करुन लवकर मिळणे, शेती पंपाला एकसारखी लाईट दहा तास मिळण्याबाबत शेती पंपाच्या जीर्ण झालेल्या वाकलेले पोल, तारा, दिवे, दुरुस्ती, एमसीबीसी स्विचचा लोड कमी करणे, सिंगल फेजच्या लाईन आणि थ्री फेजची लाईन एकच पोलवर असलेले वेगळ्या करणे तसेच आदी वीज संदर्भातील विषयाबाबतीत उरुळी कांचन महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदिप महामुलकर यांच्याकडे पूर्व हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई, शिरसवडी, बिवरी, कोरेगावमुळ येथील शेतकरी बांधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला तालुका अध्यक्षा सुरेखा शिवाजीराव भोरडे, बिवरीचे माजी सरपंच सुधिर गोते,सिरसवडीचे माजी सरपंच सतिष नागवडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भोरडे,राष्ट्रवादीचे ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मानसिंग गावडे, माजी चेअरमन प्रमोद गोते, गणेश गोते, सुरेश चितळकर, सुप्रिया घावटे, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.