लोणी काळभोर, ता. 13 : सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करताना वैज्ञानिकांचा नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी त्या पाकीट अथवा पुडीच्या दर्शनी भागात आरोग्यासाठी धोकादायक आहे. असा इशारा लिहिलेला असतो. मात्र धोक्याचा इशारा लिहिलेला नसताना देखील सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने विकणाऱ्या 5 टपऱ्यांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली आहे.
लोणी स्टेशन परिसरात एक खूप मोठे शैक्षणिक संकुल आहे. या संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या एमआयटी चौकात अनेक टपऱ्या आहेत. येथील स्मोकर व शनी पान शॉपमधून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक असलेले सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री केली जात आहे. त्याचबरोबर लोणी फाटा येथील मल्हार तर थेऊर फाटा येथील जय मल्हार व रुबाब पान शॉप या टपऱ्यांमधून देखील तंबाखूजन्य पदार्थ विकला जातो. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता.12) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वरील पाचही टपऱ्यांवर छापे टाकले. तेव्हा या टपऱ्यांमध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. तसेच महाराष्ट्रात बंदी असलेले इतर तंबाखूजन्य पदार्थ सापडले. पोलिसांनी या पाचही टपऱ्यांवर कारवाई केली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार प्रदीप क्षीरसागर, पोलीस अंमलदार अक्षय कटके, किशोर कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत करून भरभरून कौतुक केले आहे. तसेच अजूनही या प्रकारच्या कारवाई कराव्यात. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.