विशाल कदम
Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खेळाडू सेजल सिंगने आशियाई साँबो स्पर्धेत कास्य पदक पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सेजलने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे लोणी काळभोरसह संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. (Proud: Loni Kalbhor athlete Sejal Singh creates history, wins bronze medal in Asian Sambo Championship; Mana Tura in Shirpecha of Pune district)
पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
वरिष्ठ आशियाई साँबो स्पर्धा २०२३ या स्पर्धेचे आयोजन अस्थाना (कझाकिस्तान) येथे ७ ते ११ जून या दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत सेजल विजयबहाद्दूर सिंग हिने भारताच्या वतीने ६५ किलो वजनी गटात कॉम्बॅट या प्रकारांमध्ये भाग घेतला होता. (Loni Kalbhor News) तिने या प्रकारांमध्ये कास्य पदक पटकाविले आहे.
दरम्यान, पुण्यातील पर्वती येथील खेळाडू मनीषा पाटोळे हिने भारताच्या वतीने ८० किलो वजनी गटात कॉम्बॅट या प्रकारांमध्ये भाग घेतला होता. तिने या प्रकारांमध्ये कास्य पदकाला गवसणी घातली आहे. (Loni Kalbhor News) मनीषाने मिळविलेल्या या यशाबद्दल तिच्यावर राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सेजल सिंगने व मनीषा पाटोळे या दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल भारताचे साँबो इंडिया असोशियनचे अध्यक्ष डॉ. भागीरथ लाल, सचिव शिल्पी अरोरा मॅम व महाराष्ट्र स्पोर्ट्स साँबो असोसिएशनचे सचिव कुमार उगाडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर…