लोणी काळभोर, (पुणे) : शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे ‘केंद्र, राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड…होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिर चौकात शनिवारी (ता.७) घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांना गाजर योजना, फेकू योजना, कागद योजना, जाहिरातबाज योजना अशा शब्दांत शिवसेनेकडून (उबाठा) टीका करण्यात आली.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे विभागाचे समन्वयक माजी आमदार रवींद्र मिरलेकर, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार तसेच माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, कामगार सेना चिटणीस रघुनाथ कुचिक, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख मनोज इसवे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, युवासेना तालुकाप्रमुख प्रताप कांचन, उपतालुका प्रमुख राजेश काळभोर, स्वप्नील कुंजीर, तालुका संघटक तानाजी कुंजीर, विभाग प्रमुख श्रीकांत मेमाणे, संजय कुंजीर, कृष्णा अप्पा चौधरी, राहुल काकडे, बाळासाहेब काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, राहुल काळभोर, संतोष भोसले, नितीन जगताप, शिवाजी काळभोर, राजेंद्र जोशी, अजय माने, विनोद वाघ, अतुल शिंदे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, प्रास्ताविकेतून उज्ज्वला गॅस, कामगार पेन्शन, श्रावणबाळ, बेरोजगार युवकांना रोजगार भत्ता आदी योजनांपासून लाभार्थी वंचित असून, या योजना फक्त कागदावरच आहेत. लोणी काळभोर येथून करण्यात आलेल्या चित्रफितीद्वारे सरकारने दिलेले आश्वासनांचा आढावा तसेच किती योजना पूर्ण झाल्या व किती योजना पूर्ण झाल्या नाहीत, असे अनेक प्रश्न विचारत रथ गावातून फिरविण्यात आला.