Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हांडेवाडी (ता. हवेली) येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. असे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी दिले. (Bail granted to the accused in the murder case in Loni Kalbhor)
सतिश मोहन चव्हाण (रा. हांडेवाडी पुणे) असे जामीन मंजूर झालेल्याचे नाव आहे. (Loni Kalbhor News) तर करण हांडे असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
लोणी काळभोर पोलीसठाण्याच्या हद्दीत झाला होता खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा करण हांडे हा हांडेवाडी परिसरातील एका गॅरेज मध्ये काम करीत होता. तर करण आणि आरोपी सतिश चव्हाण हे एकमेकांचे मित्र होते.
दरम्यान, आरोपी सतीश हा करण हांडे याला अधुन मधुन घराचे बाहेर भेटण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर करण याने सतीशला परत भेटु नये असे सांगीतले होते. (Loni Kalbhor News) तसेच फिर्यादी यांनी आरोपी सतिशला घरी यायचे नाही व मुलगा करण यांस त्रास देवु नको असे अनेकदा सांगीतले होते.
करण हा नेहमीप्रमाणे १८ मार्च २०२२ ला गॅरेजवर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरातुन कामावर गेला होता. त्यांनतर करण हा पत्नीला अॅक्टीवा गाडीवर घरी सोडविण्यासाठी चार वाजण्याच्या सुमारास चालला होता. तेव्हा आरोपी सतीश याने शिवीगाळ केली. (Loni Kalbhor News) त्यानंतर करणने पत्नीस घरी सोडले. आणि करण काहीही न बोलता रागाच्या भरात घरातून निघुन गेला. तो त्या दिवशी रात्री घरी आला नाही. त्यानंतर करणची पत्नीने करण मिसिंग झाल्याची तक्रार उरुळी देवाची पोलीस ठाण्यात दिली.
त्यानंतर करणची अॅक्टीवा गाड़ी के पी वाईन्स दुकानाच्या शेजारी रिकाम्या जागेमध्ये कच्च्या रोडच्या गेटजवळ मिळुन आली. म्हणुन सदर परिसरात करणच्या वडिलांनी करणचा शोध घेतला असता. २० मार्च २०२२ ला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १०० फुट जमिनीच्या आतमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत एक इसम दिसुन आला. (Loni Kalbhor News) याप्रकरणी हांडे यांनी लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नमुद पुरलेल्या इसमास बाहेर काढले.
दरम्यान, अनोळखी इसमाच्या गळ्यांस वायरच्या सहाय्याने गळफास दिल्याचे व डोक्यास जखमा दिसत होत्या. (Loni Kalbhor News) तसेच त्याच्या अंगावरील कपड़े व कमरेचा बेल्ट, चेहरा ओळखुन पाहुन तो मुलगा करण हांडे आहे. असे फिर्यादी यांनी पोलीसांनी सांगीतले.
याप्रकरणी करणच्या वडिलांनी आरोपी सतिश चव्हाण याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.(Loni Kalbhor News) सदर गुन्ह्याचा खटला हा शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात आरोपी सतिश चव्हाण याने जामिनासाठी ॲड.गणेश माने यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता.
ॲड.गणेश माने यांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जमीन मंजूर केला आहे.(Loni Kalbhor News) हे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी दिले आहेत. तर या खटल्यात ॲड.गणेश माने यांना ॲड.धनंजय गलांडे, ॲड.उमेश मांजरे व ॲड.रुकसार मुल्ला यांचे सहकार्य मिळाले.